शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

अस्वस्थेतेतच विरला ‘अजितदादां’च्या उपमुख्यमंत्री पदाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 1:35 PM

राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थेतेतच ‘अजितदादां’ना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंद विरुन गेल्याचे चित्र होते.

पुणे (बारामती ) : राज्यात शनिवारी (दि २३) भल्या सकाळीच झालेल्या राजकीय भुकंपाचे राष्ट्रवादीच्या माहेरघरी बारामतीत तीव्र पडसाद उमटले. राजकीय घडामोंडींपेक्षा बारामतीची ओळख असणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थेतेतच ‘अजितदादां’ना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंद विरुन गेल्याचे चित्र होते. आज सकाळी  देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप समवेत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे,यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसल्याचे जाहीर केले. तसेच दुपारी १२ च्या दरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हकालपट्टी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर बारामतीत शांतता पसरली.यावेळी उपमुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंदापेक्षा ही शांतता अधिक ठळकपणे जाणवली.दरम्यान, अजित पवार यांच्या  शहरातील सहयोग निवासस्थानी पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहरात देखील पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी बारामतीत फटाक़े वाजवले.मात्र, अपेक्षित गर्दी,तो जल्लोष दिसलाच नाही.

...आम्ही पुन्हा आलोयबारामतीत राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली असली तरी भाजपमध्ये गटामध्ये जल्लोषाचे वातावरण होते. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांचीआताषबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, नागपुरचा वाघ आला, आम्ही पुन्हा आलोय ,आम्ही पुन्हा आलोय,अशी जोरदार घोषणाबाजी केली. पवार कुटुंबात  फुट राजकीय घडामोडींच्या सुरवातील अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विश्वासात घेवुन भाजप पाठींब्याबाबत निर्णय घेतल्याचाबारामतीकरांचा अंदाज होता.मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेनंतर हा राजकीय भुकंपाचा नागरीकांना अंदाज आला. तसेच खासदारसुप्रिया सुळे यांनी ‘पक्ष आणि कुटुुंबात फुट’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे नागरीकांच्या लक्षात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस