शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीही झाली असती ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: September 1, 2015 03:59 IST

सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांची स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची क्षमता असूनही राज्यातील नव्हे, तर देशातील ‘पॉवरबाज’ सत्ताकेंद्र समजले जाणारे

सुनील राऊत, बारामतीसुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांची स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची क्षमता असूनही राज्यातील नव्हे, तर देशातील ‘पॉवरबाज’ सत्ताकेंद्र समजले जाणारे बारामती राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट होऊ शकली नाही. रस्ते, रेल्वे, तसेच हवाई मार्गाची सुविधा, वेगाने विकसित होणारे औद्योगिकीकरण यामुळे शहरातील नागरीकरणाचा वेग वाढत आहे. मात्र, असे असताना, या स्पर्धेत बारामतीची वर्णी लागली नसल्याचे दिसून येते. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने केंद्र शासनाची जेएनएनयूआरएम योजना बंद केल्यानंतर, मोठ्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी योजना घोषित केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने जुलै महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत राज्यातील १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या २६ महापालिका, तसेच १९ ‘अ’ दर्जाच्या नगर परिषदांची अशी ४६ शहरांची निवड केली होती. राज्य शासनाने ज्या शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड केली, त्या शहरांसाठी एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या आणि दर वर्षी ५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा म्हणून उभे करू शकणारे शहर हे दोन निकष ठेवले होते. प्रत्यक्षात बारामती शहराची लोकसंख्या ही १ लाखापेक्षा जास्त आहे. तसेच २०१५-१६ चे अंदाजपत्रक जवळपास २९१ कोटी रुपयांचे आहे. त्यात सुमारे २१७ कोटी रुपयांची भांडवली, तर ७४ कोटींचा महसुली खर्च आहे. त्यामुळे बारामती शहर या स्पर्धेत सहजरीत्या उतरू शकले असते. मात्र, शासनाकडून केवळ ‘अ’ दर्जा असलेल्या नगर परिषदांचाच यात समावेश करण्यात आल्याने बारामती शहर शासनाच्या निवडप्रक्रियेतून बाहेर पडले.पुणे महापालिकेच्या एका कार्यक्रमात दीड वर्षापूर्वी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठी शहरे किती वाढावित याला मर्यादा असाव्यात, असे सूचक वक्तव्य केले होते. मोठ्या शहरांची वाढ थांबवायची असतील, तर लहान शहरे विकसित करून त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने, रस्ते, विमान वाहतूक, तसेच रेल्वेद्वारे मालवाहतूक या सर्व प्रकारच्या दळणवळणासाठी बारामती हे शहर विकासासाठी योग्य शहर आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या अशा योजनांच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मिळाल्यास शहराच्या विकासाचे चित्र आणखी बदलणार आहे. केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात देशातील १०० शहरे पुढील ५ वर्षांत विकसित केली जाणार आहेत. त्यामुळे निदान आत्ता हुकलेली संधी पुढील पाच वर्षांत मिळाल्यास ते शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बारामती नगर परिषदेस ‘अ’ दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठविला. त्या वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार हेच राज्याचे उपमुख्यमंत्री होते. या प्रस्तावास दीड वर्ष लोटले तरी मान्यता मिळालेली नाही. त्याच वर्षी निर्णय घेतला असता, तर आजचे चित्र वेगळे असते.बारामती शहराचा गेल्या दशकभरातील वाढते नागरीकरण आणि विस्तार पाहून राज्य शासनाने आॅक्टोबर २०१२मध्ये शहराची हद्दवाढ केली. त्या वेळी शहराचा विस्तार ४.७० चौरस किलोमीटर तर लोकसंख्या ५० हजार होती. हद्दवाढीनंतर विस्तार दहा पटीने म्हणजेच ५५ चौरस किलोमीटर तर लोकसंख्या १ लाख २० हजारांच्या घरात पोहोचली. त्यामुळे नगरपालिकेकडून मार्च २०१४ मध्ये ‘अ ’ दर्जाचे निकष पूर्ण होत होते.