शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार; राजु शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 21:07 IST

शक्तिपीठ महामार्ग हा भाविकांसाठी नाही, विकासासाठी नाही, तर राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी

बारामती - देशात तयार केल्या जाणार्या एक किलोमीटरच्या सहा पदरी रस्त्यासाठी साधारण ३५ कोटी रुपये खर्च येतो. शक्तिपीठ महामार्ग ८०२ किलोमीटर लांबी  आहे.या अंतराचा हिशोब केल्या त्याचा खर्च ८६ हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. म्हणजे एका किलोमीटरसाठी १०७ कोटी ६० लाख कोटी म्हणजे तिप्पट खर्च जास्त येतो. हा रस्ता ३० ते ३५ हजार कोटीत होणे अपेक्षित आहे.त्यानुसार या महामार्गात पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा  आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केला.यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग हा भाविकांसाठी नाही, विकासासाठी नाही, तर राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी  असल्याचा दावा शेट्टी यांनी केला.अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. आमचं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र हे आश्वासन त्यांनी बाजूला ठेवलं.

या अर्थसंकल्पात त्याची तरतूद व्हायला हवी होती. ती झाली नाही. मागच्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी जे अनुदान मिळत होते, ते अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदानाच्या योजना जाहीर केल्या. मात्र अनुदान मिळाले नसल्याचे शेट्ठी यांनी निदर्शनास आणले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShakti Peethasशक्तिपीठroad transportरस्ते वाहतूकRaju Shettyराजू शेट्टी