पोलिसाने केला महिलेला 'I Love You' मेसेज; 'होकार असेल तर सांग...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:32 PM2022-10-03T16:32:21+5:302022-10-03T16:32:35+5:30

प्रकरण समोर येताच अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर....

baramati Police send 'I Love You' message to woman pune crime news | पोलिसाने केला महिलेला 'I Love You' मेसेज; 'होकार असेल तर सांग...'

पोलिसाने केला महिलेला 'I Love You' मेसेज; 'होकार असेल तर सांग...'

googlenewsNext

बारामती (पुणे) : जेथे ‘कुंपणच शेत खाते’ तेथे इतरांकडून काय अपेक्षा करणार? समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मात्र, बारामती परिसरातील एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वत: एका महिलेला अश्लिल संदेश पाठवत पोलिसांच्या प्रतिमेला आणि नियमांना सुरुंग लावण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, याबाबत कुणकूण लागताच संबंधित अधिकारी पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेले असल्याची माहिती पुढे येत आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिलेला तिच्या व्हॉटसऍपवर अश्लिल मेसेज पाठवल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याची आता वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. बारामती विभागात एका पोलीस ठाण्याचा हा वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रमुख आहे. त्याने एका महिलेला तिच्या व्हॉटसऍपवर अश्लील मेसेज ‘आय लव्ह यु’ पाठवला आहे. त्याचा स्क्रीनशॉट काही जणांकडे असल्याची माहिती समजते.

मागील वर्षी याच काळात बारामतीतच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे एका मुलीसोबतचे फोटो व क्लिप व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर बारामतीतून संबंधित पोलिस अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी केली गेली. याची विधानसभेपर्यंत चर्चा झाली होती. थेट तक्रार नसल्याने संबंधित अधिकाऱ्याचे केवळ बदलीवरच निभावले.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बारामतीत पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे. या अधिकाऱ्याचे हे मेसेज सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे चौकशी सुरु केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले.

या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला या पोलिस अधिकाऱ्याने काही अश्लिल इमोजीही पाठवलेले आहेत. ‘आय लव्ह यू’ तसेच तुझा होकार आहे की नाही ते एकदाच सांग शेवटच विचारतोय, अशी देखील थेट विचारणा केल्याचे या मेसेजमध्ये म्हटल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे रात्री अकरा नंतर हे मेसेज केले गेल्याचे संदेशातील वेळेवरुन स्पष्ट होत आहे.

Web Title: baramati Police send 'I Love You' message to woman pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.