शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

बारामती पोलिसांनी मोठी कारवाई, मध्यरात्री भरपावसात ३१२ किलो गांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 01:06 IST

चित्रपटाला शोभेल असा थरार! पाठलाग करुन अडवला टेम्पो

ठळक मुद्देपोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल

बारामती:बारामती ग्रामीण पोलिसांनी भर पावसात सोमवारी(दि.२१) मध्यरात्री ३ वाजता पोलिसांनी कारवाई करीत ३१२ किलो गांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आंध्रप्रदेशातुन आणलेला गांजा या मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली होती.मात्र,इशारा करुन देखील टेम्पो निघुन गेला.यावेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी कारमधुन टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना याबाबत माहिती मिळाली होती.त्यानुसार पाटस आणि भिगवण मार्गावर दोन पोलीस पथकाद्वारे वाहनांची कसुन तपासणी सुरु करण्यात आली. याचवेळी मध्यरात्री ३ च्या सुमारास उंडवडी येथे पाटसवरुन बारामतीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला (एमएच.१०. सीआर. ४३२६)  पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला.मात्र, त्यानंतर देखील चालकाने टेम्पो न थांबवता वेगात नेण्याचा प्रयत्न केला.पोलीसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला अडवले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यात ११ पोती आढळून आली. ही पोती खोलून पाहिली असता त्यात खाकी रंगाच्या प्लास्टिक बॅगांमध्ये हा गांजा भरण्यात आला होता. पोलिसांनी सुमारे ४६ लाख रुपयांच्या ३१२ किलो गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय जालिंदर कणसे  (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) , विशाल मनोहर राठोड  (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  

  याबाबत हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे,योगेश लंगुटे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  दिलीप सोनवणे,पोलीस हवालदार अनिल ओमासे, भानुदास बंडगर, दत्तात्रय सोननीस, पोलीस नाईक अनिल खेडकर, परीमल मानेर,रणजित मुळीक,संतोष मखरे,राजेंद्र काळे,प्रशांत राऊत, अमोल नरुटे,दत्तात्रय मदने,नंदु जाधव,विनोद लोखंडे, भुले्श्वर मरळे,पोपट कवितके,मंगेश कांबळे,योगेश चितारे,चालक अबरार शेख यांनी ही कारवाई केली.

—————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक