बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम अंतिम टप्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:22 IST2025-12-16T19:21:17+5:302025-12-16T19:22:15+5:30
- निवडणुक कार्यक्रम अंतिम टप्यात; २० प्रभागाकरिता १४५ ,अध्यक्ष पदा करिता १४ उमेदवार निवडणूक रींगणात

बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम अंतिम टप्यात
बारामती - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम अंतिम टप्यात आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने शहरांमध्ये ११५ ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.११५ मतदान केंद्रांवर एकूण १ लाख १ हजार ९९२ मतदार शनिवारी(दि २०) मतदानाच्या दिवशी मतदान करणार आहेत.या निवडणुकीत एकूण २० प्रभागाकरिता एकूण १४५ उमेदवार ,अध्यक्ष पदा करिता १४ उमेदवार निवडणूक रींगणात आहेत,अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ.संगीता राजापुरकर,सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी पंकज भुसे यांनी दिली.
सर्व मतदान केंद्रावर बारामती नगरपरिषद मार्फत सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीकरीता व्हील चेअरची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच मा. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श महिला मतदान केंद्र अंतर्गत तांदूळवाडी हद्दीतील मतदान केंद्र मेडिकोज गिल्ड हॉल, स्टेशन रोड, रामगल्ली येथील मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ७५० अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एकूण चार मतदान प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच एकूण ११५ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वाटप व स्विकारणे करिता म.ए.सो चे ग.भि देशपांडे विद्यालय सभागृह, बारामती येथे केंद्र उभारण्यात आलेले आहे.या ठिकाणी पोलीस स्टेशन मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
बारामती नगरपरिषद मार्फत सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी राजकीय प्रतिनिधीच्या उपस्थित मध्ये मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे इव्हीएम तयार करुन स्ट्रॉंगरुम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सार्वत्रिक निवडणूक मतदान मोजणी रविवारी( दि २१) म.ए.सो चे ग.भि देशपांडे विद्यालय सभागृहात सकाळी १०. ०० वाजले पासून होणार आहे. मतदान मोजणीसाठी एकूण १५७ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान मोजणी केंद्रावर अधिकृत ओळखपत्र असणा-या अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतीरिक्त अन्या कोणासही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.