शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Baramati Lok Sabha Election : यु-टर्न... शिवतारेंंच्या मुखी चक्क 'सुविचार'; बारामतीमधील उमेदवारीवर दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 5:37 PM

Baramati Lok Sabha Election : दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्याचे समोर आले. या बैठकीत शिवतारेंची समजूत काढल्याचे बोलले जात आहे.

Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात भेटीगाठी वाढवून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका सुरू केल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्याचे समोर आले. या बैठकीत शिवतारेंची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. आज विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला. 

कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...'

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अडीच तास बैठक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या. आता उद्या मी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या मी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. राजकारणात आम्ही स्वत:साठी नाहीतर जनतेसाठी लढत असतो. मी उद्याची बैठक करुन पुन्हा मुंबईला जाणार आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले. 

राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो

यावेळी बोलताना शिवतारे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असणाऱ्या वादावर सूचक वक्तव्य केले. शिवतारे म्हणाले, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असं सूचक विधान शिवतारे यांनी केले आहे. यामुळे आता शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही याची चर्चा सुरू आहे. 

"उद्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे मत काय आहे हे जाणून घेणार आहे. त्यांची मत निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील हे जाणून घेणार आहे. जर उद्या गरज वाटली तर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितलं. मी जनतेचा आवाज बघून मी हे पाऊल उचललं होतं, त्यामुळे बारामती मतदारसंघातील हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, असंही शिवतारे म्हणाले.  (Baramati Lok Sabha Election )

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Baramatiबारामती