शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या जनाईचा पाणी प्रश्न पेटला; सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 19:28 IST

तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी पासुन हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी आमरण उपोषण करणार

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परगण्याला जीवदान देणारी जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काचा पाणी प्रश्न पेटला आहे. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर शेतकऱ्यांनी जनाई योजनेतील तृटींचा पाढा वाचला. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास येत्या २६ जानेवारीला आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सुपे येथील माऊली मंदिरात जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काच्या पाणी प्रश्नासंबंधीची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने पाण्याचे एक वर्षाचे नियोजन करुन तीन टप्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेद्वारे गेल्या ३० वर्षात २० टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. ही योजना सुरु झाल्यापासुन आंबी, चांदगुडेवाडीचा काही भाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी आणि जळगाव सुपे आदी गावांचा बहुतांश शिवार ओलिताखाली आलेला नाही. त्यामुळे आमच्या हक्काचे २ हजार १७० एमसीएफटी पाण्याचे तीन टप्यात वाटप करावे. तसेच पावसाळ्यात नद्यांना ओव्हर फ्लो होणारे पाणी लाभधारक शेतकऱ्याना मिळावे. येथे जलसंपदाचे ऑफिस व्हावे अशा एकुण प्रमुख १२ मागण्याचे निवेदन खासदार सुळे यांच्याकडे देण्यात आले. 

यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, ॲड. दत्तायय बोरकर, ज्ञानेश्वर कौले, महादेव भोंडवे, कालिदास भोंडवे आदींनी जनाई मध्ये असलेल्या तृटींबाबत सवुस्तर माहिती दिली. यावेळी शिरसाई उपसा योजनेचे उपोषणकर्ते व माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी जलसंपदा आणि महापालिका यांच्याविरोधात उच्च न्यायालयात हक्काच्या पाण्याबाबत दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.        दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अतुल कपोले यांच्याशी फोन द्वारे माहिती दिली. यावेळी जनाईचा प्रश्न त्वरित सोडवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी कपोले यांनी येत्या २३ जानेवारी पर्यत शेतकऱ्यांची बैठक घेवु. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करु असे सुळे यांना सांगितले.  मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन जलसंपदा अधिकाऱ्यांनी सुप्यात येवुन आमचे प्रश्न मार्गी लावावेत यावर शेतकरी ठाम आहेत. तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी पासुन हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे पत्र सुळे यांना यावेळी देण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSocialसामाजिकagitationआंदोलनFarmerशेतकरीSupriya Suleसुप्रिया सुळे