अजितदादांच्या अपघाताचा तपास वेगवान; घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल; ब्लॅक बॉक्स उघडणार अपघाताचं गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:04 IST2026-01-30T13:59:16+5:302026-01-30T14:04:01+5:30

बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Baramati Crash Probe Intensifies: Forensic Team Collects Evidence Black Box to Reveal Cause of Ajit Pawar Fatal Accident | अजितदादांच्या अपघाताचा तपास वेगवान; घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल; ब्लॅक बॉक्स उघडणार अपघाताचं गूढ

अजितदादांच्या अपघाताचा तपास वेगवान; घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल; ब्लॅक बॉक्स उघडणार अपघाताचं गूढ

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, बारामती येथील विमान अपघातस्थळावर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुक्रवारी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या एका विशेष पथकाने पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली आणि महत्त्वाचे नमुने गोळा केले. या भीषण अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तपासाचे केंद्र आता 'ब्लॅक बॉक्स' आणि विमानाचे अवशेष

दुर्देवी ठरलेल्या लिअरजेट ४५ विमानाचा ब्लॅक बॉक्स गुरुवारीच जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आज फॉरेन्सिक टीमने विमानाच्या शेपटीचा भाग आणि इतर अवशेषांची बारकाईने तपासणी केली. एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोद्वारे हा तपास केला जात असून अपघातामागचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बारामती विमानतळावर उतरत असताना खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीपासून अवघ्या २०० मीटरवर कोसळले आणि त्याचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की, केवळ हातातील मनगटी घड्याळावरून अजित पवारांची ओळख पटवणे शक्य झाले.

पवार कुटुंबियांनी अस्थी केल्या गोळा
 
आज सकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दादांच्या अस्थी गोळा केल्या. गुरुवारी झालेल्या अंत्यसंस्काराला जनसागराचा महापूर लोटला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना प्रत्येक समर्थकाचे डोळे ओलावले होते.

पाच कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

या अपघातात केवळ राजकीय नेतृत्वच नाही, तर इतर चार कर्तव्यदक्ष व्यक्तींचाही बळी गेला. यामध्ये कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक), कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक), पिंकी माळी, विदिप जाधव यांचा समावेश होता. या सर्वांच्या निधनामुळे पोलीस दल आणि विमान वाहतूक क्षेत्रातही शोक व्यक्त केला जात आहे.

Web Title : अजित पवार विमान दुर्घटना: जाँच तेज, ब्लैक बॉक्स खोलेगा रहस्य

Web Summary : अजित पवार विमान दुर्घटना की जाँच तेज हो गई है, फोरेंसिक टीम घटनास्थल पर है। दुर्घटना का कारण जानने के लिए ब्लैक बॉक्स का विश्लेषण किया जाएगा। बारामती हवाई अड्डे के पास हुई इस दुखद दुर्घटना में पवार सहित पांच लोगों की मौत हो गई। विमानन समुदाय शोक में है।

Web Title : Ajit Pawar Plane Crash Investigation Accelerates; Black Box to Reveal Mystery

Web Summary : The Ajit Pawar plane crash investigation intensifies with forensic teams examining the site. The black box, crucial for determining the cause, will be analyzed. Five people, including Pawar, died in the tragic accident near Baramati airport. The aviation community mourns the loss.