शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत
2
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
3
मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज
4
लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
5
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
6
हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय
7
जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम
8
चॉकलेट्स खावीत इतक्या सहज खाते सीमेंट-प्लॅस्टरचे गोळे, कोण आहे ही महिला? जाणून घ्या
9
NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NTA ला दिली 'क्लीन चिट'
10
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
11
अजय देवगण-तब्बूची रोमँटिक केमिस्ट्री ३० वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर, ट्रेलर पाहिलात का?
12
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
13
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"
14
रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'
15
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
16
शुक्रवारी दुर्गाष्टमी: ५ गोष्टी नक्की करा, ‘या’ स्तोत्र पठणाने शुभ-लाभ, लक्ष्मी कृपा मिळवा
17
सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध
18
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
19
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
20
'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी

बारामती परिमंडलाने तौक्ते चक्रीवादळात खंडित झालेला वीजपुरवठा केला पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 6:39 PM

कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नाने ९५ टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत

ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्यांचे चार दिवसांपासून अविरत परिश्रम

बारामती: कोरोना सारख्या महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौक्ते चक्रीवादळाने’ विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील ९५ टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश मिळवले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील ५६ वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सीजन प्लांन्ट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरु केला होता. यामध्ये ५४ उपकेंद्रे दुसऱ्याच दिवशी सुरु झाली. मात्र महाबळेश्वरमधील वेण्णा लेक व कोळी आळी जीआयएस उपकेंद्रे सुरु होण्यास वारंवार अडथळे येत होते. काल रात्री उशिरा हे दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.

बारामती परिमंडलात ७ लाख २४ हजार ३८८ ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळाने विस्कळित झाला होता. बुधवारी दुपारपर्यंत ७ लाख १२ हजार ४२० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी ६२३ विजेचे खांब उभे करण्यात आले. बाधित झालेल्या १ हजार ४३८  पैकी १ हजार ४१५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. तर अद्याप गावाबाहेर, डोंगरात वस्तीकरुन राहिलेल्या १४५  रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे बाकी आहे.

बारामती परिमंडलात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार ५९५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील ४ लाख ४२ हजार ७५८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील ८ हजार व कराड विभागातील ३ हजार १०० ग्राहकांच्या वीजपुरवठ्याचे काम युद्‌धपातळीवर सुरु आहे. याकामी महावितरणचे व ठेकेदारांचे मनुष्यबळ अहोरात्र परिश्रम घेत आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीelectricityवीजcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार