शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll Election: परंपरेचा वारसा, भावनांचा स्पर्श; सुनेत्रा पवारांचा बारामतीत शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:26 IST

Baramati bypoll Election अजित पवार कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी हनुमंतांचे दर्शन घेत असत, ही परंपरा कायम ठेवत सुनेत्रा पवार यांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवले.

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि. ६) जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पवार यांच्या उमेदवारीला बळ दिले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी परंपरेनुसार धार्मिक आणि भावनिक स्थळांना भेट देत आशीर्वाद घेतले. सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासमवेत श्रीक्षेत्र कन्हेरी हनुमान मंदिर येथे जाऊन मारुतीरायांचे दर्शन घेतले.

अजित पवार कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी हनुमंतांचे दर्शन घेत असत, ही परंपरा कायम ठेवत सुनेत्रा पवार यांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवले. त्यानंतर भैरवनाथ मंदिर येथे जाऊन भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर पवार कुटुंबीयांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन ‘अजितदादा’ यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. तसेच बारामती शहरातील कसबा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महायुती आणि मित्रपक्षांच्या मेळाव्यानंतर उत्साहाच्या वातावरणात सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनामुळे बारामती पोटनिवडणुकीत महायुतीने आपली ताकद दाखवून दिल्याचे मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar files nomination in Baramati with show of strength.

Web Summary : Sunetra Pawar filed her nomination for the Baramati bypoll, displaying strength with support from key Mahayuti leaders. Before filing, she visited religious sites, seeking blessings and paying respects at memorials, following traditions established by Ajit Pawar.
टॅग्स :PuneपुणेSunetra Pawarसुनेत्रा पवारBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026MLAआमदारAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीcongressकाँग्रेस