पुण्याच्या खंडपीठासाठी काकडेंना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 19:32 IST2018-05-18T19:32:45+5:302018-05-18T19:32:45+5:30

पुणे खंडपीठ ठरावाला ४० वर्षे उलटल्यानंतही पुण्यात खंडपीठ सुरू झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने काकडे यांची भेट घेतली.

bar association request to Kakade for a court division bench | पुण्याच्या खंडपीठासाठी काकडेंना निवेदन 

पुण्याच्या खंडपीठासाठी काकडेंना निवेदन 

ठळक मुद्देकाकडे यांचे खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

पुणे : शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काकडे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले. 
पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, उपाध्यक्ष भूपेंद्र गोसावी, रेखा करंडे, सचिव संतोष शितोळे, लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस सुदाम मुरकुटे, खजिनदार प्रताप मोरे, विजयसिंह ठोंबरे, आनंद केकाण यावेळी उपस्थित होते. पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, असा ठराव १९७८ मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार १९८१ मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. या ठरावाला ४० वर्षे उलटल्यानंतही पुण्यात खंडपीठ सुरू झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने काकडे यांची भेट घेतली. शहरात खंडपीठ सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच बारच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन काकडे यांनी यावेळी दिले. 
 

Web Title: bar association request to Kakade for a court division bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.