शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
3
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
4
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
5
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
6
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
7
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
8
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
9
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
10
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
11
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
12
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
13
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
14
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
15
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
16
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
17
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
18
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
19
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
20
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 12:57 PM

गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे

ठळक मुद्देहातवळणीच्या उकडीच्या मोदकांना नागरिकांची खास पसंती

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : गणेशोत्सवातगणपतीला पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे. हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायाला चालना मिळत आहे. पुण्यातील सुगरणींच्या मोदकांचा प्रवास ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे. शहरात दहा हजारांहून अधिक महिला, तसेच पुरुषही मोदकांच्या व्यवसायात असून यातून दरवर्षी एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाजे दीड लाख मोदकांची शहरात विक्री होते.

पुण्यातून फ्रोजन मोदकांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गूळ, नारळ, वेलदोडा, खसखस यांचे सारण आणि तांदळाची उकड यापासून तयार केलेले हातवळणीचे उकडीचे मोदक उणे १८ डिग्री सेल्शिअसमध्ये ‘ब्लास्ट फ्रिजिंग’ पद्धतीने साठवले जातात आणि वाहतूकही याच तापमानात केली जाते. फ्रोजन मोदक एक वर्ष टिकू शकतात. एका मोदक ११ ते १३ पाऱ्यांचा असून त्याचे वजन ६० ते ७० ग्रॅम असते आणि त्याची किंमत साधारणपणे २५-३० रुपये असते. मराठवाडा, विदर्भामध्ये तळणीच्या मोदकांना जास्त पसंती दिली जाते, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी ‘लोकमत’ला दिली. हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना नागरिकांची खास पसंती 

''हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायासाठी उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले आहे. हातवळणीचे मोदक अत्यंत कौशल्याचे आणि सरावाचे काम असते. पती, पत्नी, मुले, घरातील ज्येष्ठ नागरिक असे सर्व कुटुंब मिळून या व्यवसायाला हातभार लावतात. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत पुण्यात मोदकांची सर्वाधिक विक्री होते. त्यासाठी आदल्या दिवशी रात्रभर जागरण करून ऑर्डर पूर्ण केल्या जातात. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मागणी १० टक्क्यांपर्यंत कमी होते. गौरी जेवणाच्या दिवशी २०-२५ टक्के मागणी असते. गेल्या २० वर्षांपासून आपण महिलांना हातवळणीच्या उकडीच्या मोदकांचे प्रशिक्षण देत आहोत. यावर्षी ३५० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. पुरुषांचाही या व्यवसायात सहभाग असतो. असं महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितलं.''

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव