Join us  

अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:51 AM

लोकलमध्ये महिलेची मुजोरी, अभिनेत्री अश्विनी कासारने व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

मुंबई लोकल ही नागरिकांची लाईफलाईन आहे. लाखो नागरिक लोकलने प्रवास करतात. यामुळे वेळही वाचतो आणि पैशांचीही बचत होते. मात्र दिवसेंदिवस लोकमधील गर्दी, इतर नागरिकांची मुजोरी, असुरक्षितताही वाढत चालली आहे. याचा अनुभव सामान्यांना तर येतोच शिवाय सेलिब्रिटीही याला बळी पडले आहेत. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासारने (Ashwini Kasar) व्हिडिओ शेअर करत तिला मुंबई लोकलमध्ये आलेला वाईट अनुभव सांगितला आहे.

अनेक लोकांना लोकलमध्ये सीटवर पाय ठेवून बसण्याची सवय असते. काही जण अशा लोकांचा विरोध करतात मात्र त्यांना उलट या लोकांच्या मुजोरीलाच सामोरं जावं लागतं. असाच अनुभव अभिनेत्री अश्विनी कासारला आला. तिने लोकलमध्ये समोर बसलेल्या महिलेचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेवून बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मराठी भाषा वापरली गेली तर त्यांना त्याच्याशीही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस यांच्यावर विश्वास आहे."

अश्विनी कासारने व्हिडिओतून मुंबई पोलिस , रेल्वे पोलिसांना टॅग केले आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाही ती महिला मुजोरपणाच करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. यावर आता रेल्वे पोलिस कारवाई करतात का पाहावं लागेल. 

अश्विनी कासारला 'सावित्रीज्योती' मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय तिने 'कमला', 'कट्टी बट्टी' या मालिकांमध्येही काम केलं. 

टॅग्स :मराठी अभिनेतामुंबई लोकलमुंबई पोलीससोशल मीडिया