शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बकरी ईदला युनूसमुळे तिघांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:37 AM

बकरी ईदच्या दिवशीच मेंदू मृत झालेल्या मुस्लिम समाजातील तरूणाच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला

पुणे : बकरी ईदच्या दिवशीच मेंदू मृत झालेल्या मुस्लिम समाजातील तरूणाच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या पुण्यातील दोघांसह तिघांना जीवनदान तर एकाला दृष्टी मिळाली आहे.युनूस सत्तार शेख (वय ३७, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याचे यकृत, स्वादूपिंड, २ मूत्रपिंड आणि दोन डोळे अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले. युनुस हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत लिपिक होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांचा १९ आॅगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने २१ आॅगस्ट रोजी डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड (मृत मेंदु) म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील समुपदेशकांनी त्यांची पत्नी, मुले व नातलगांशी चर्चा करून अवयवदान करण्यासाठी विनंती केली. शेख यांचे इतर अवयव चांगले असल्याने गरजु रुग्णांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतून कुटूंबियांनी अवयवदानास संमती दिली.युनूस शेख यांचे यकृत ससून रुग्णालयात तर १ मुत्रपिंड व स्वादूपिंड पुण्यातीलच सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांना देण्याचा निर्णय झाला. तर दुसरे मुत्रपिंड अश्विनी रुग्णालयातील रुग्णास आणि दोन डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी दान करण्यात आले. बुधवारी ग्रीन कॉरिडॉर करून यकृत, मूत्रपिंड व स्वादूपिंड ससून व सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा संबंधित रुग्णांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ससून रुग्णालयामध्ये सातारा येथील ५८ वर्षीय पुरुषावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, तर सह्याद्री रुग्णालयातील ४२ वर्षीय पुरुषावर मूत्रपिंड व स्वादूपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. बकरी ईदच्या दिवशीच युनूस शेख यांच्या अवयवदानामुळे रुग्णांना जीवनदान मिळाल्याने जगाला सामाजिक सलोख्याचा संदेश मिळाला आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणेBakri Eidबकरी ईद