शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात पैशांची मागणी प्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:48 IST

परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडे ३५ ते ४० लाखांची मागणी करण्यात आली. यामुळे परीक्षेपूर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करीत सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. तपासातील प्रगती आणि सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखडे यांनी चौघांचा जामीन अर्ज फेटाळला.दीपक दयाराम गायधने (वय २६, रा. नाणेकरवाडी, चाकण. मूळ रा. तामसवाडी, भंडारा), सुमित कैलाश जाधव (वय २३, रा. रानोबाई मळा, चाकण. मूळ रा. वेहेगाव, नाशिक) योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २७, रा. सोनुली वरठी, भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय २७, रा. गाव टेकडी, मध्य प्रदेश) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत.या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी चौघांनी न्यायालयात अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला युक्तिवाद गंभीर स्वरूपाचा आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. हे आरोपी या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे स्वरूप मोठे असून अद्याप तपास सुरू आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालयMPSC examएमपीएससी परीक्षाCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या