जामीन मंजूर; आई वडिलांचा जामिनासाठी मदत करण्यास नकार, आरोपी कारागृहातच
By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2025 15:09 IST2025-03-06T15:07:58+5:302025-03-06T15:09:10+5:30
सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात जामीन मंजूर केला होता

जामीन मंजूर; आई वडिलांचा जामिनासाठी मदत करण्यास नकार, आरोपी कारागृहातच
पुणे: सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात विशेष न्यायाधीश कविता दुधभाते यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, आरोपीच्या आई वडिलांनी जामिनासाठी मदत करण्यास दिला नकार दिल्याने जामीन मंजूर होऊनही आरोपी अद्यापही कारागृहातच आहे.
आरोपीच्या वतीने अँड सोनाली अरुण राखपसरे केसनंद यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की आरोपी आणि पीडित मुलीमध्ये सहमतीने संबंध आले आहेत. तसेच पीडिता १७ वर्षांची आहे. त्यामुळे तिला चांगले आणि वाईट याची समज आहे. तसेच या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यास विलंब लागला नाही. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात संपूर्ण तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. आरोपी अटक झाल्यापासून आजपर्यंत कारागृहात आहे. त्यामुळे आरोपीला जामीन नामंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र जामीन अर्जाला सरकारी पक्षाने विरोध केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला अटी शर्तीवर जामीन मंजूर केला.