शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शालेय विद्यार्थिनीची छेडछाड खटल्यातील शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन; उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 9:02 PM

पीडित विद्यार्थीनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पिडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा....

पुणे : शालेय विद्यार्थीनीची छेडछाड केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.अमोल अशोक निकम (वय २५, रा. शंकरराव जाधवनगर, येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी ४ वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ठोठावल्यापासून अमोल निकम हा येरवडा कारागृहात २७ जानेवारी २०२१ पासून शिक्षा भोगत होता.

आरोपीने सत्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. प्राजक्ता मिलिंद पवार व अ‍ॅड. ऋषिकेश केशव करवंदे यांच्या वतीने अपील दाखल करुन दाद मागितली होती. अपील दाखल करुन द्यावे व अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामिनावर सोडण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी ही विनंती मान्य करुन आरोपीला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कारागृहातून सोडण्याचा आदेश व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दिले व आरोपीचे अपील दाखल करुन घेतले. 

पीडित विद्यार्थीनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पिडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा. ९ जुलै २०१७ रोजी अमोल याने पिडित मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. सत्र न्यायालयात आरोपीने केलेला गुन्हा सरकार पक्षाने शिद्ध केल्याने त्याला ४ वर्षे कारावासाची व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. 

अ‍ॅड. प्राजक्ता पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर युक्तीवाद केला की, आरोपी शिक्षा होईपर्यंत जामीनावर होता. खटल्याची सुनावणी सुरु असताना आरोपीच्या हातून कोणतेही गैरकृत्य घडलेले नाही. त्याने जामीनाच्या सर्व अटी शर्तींचे पालन केले आहे. या अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामीनावर मुक्त केल्यास आरोपी सर्व अटी शर्तींचे पालन करील, असा युक्तीवाद अ‍ॅड. प्राजक्ता पवार यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.

टॅग्स :PuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थीMolestationविनयभंगPoliceपोलिसjailतुरुंग