पुणे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचे तीन-तेरा; प्लॅटफॉर्मवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 14:16 IST2023-08-05T14:16:10+5:302023-08-05T14:16:38+5:30
स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे....

पुणे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचे तीन-तेरा; प्लॅटफॉर्मवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकाच्या समस्यांसंदर्भात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हाणामारी करणार्या दोघांमधील एक जण दुसर्याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता आणि खाली पडणार्या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता. ही घटना येथे घडणारी पहिली नसून, येथे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे.
यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे.
या रेल्वे स्थानकापेक्षा नव्याने शहरात तयार झालेल्या मेट्रो स्थानकाची सुरक्षा मजबूत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगामी काळात घडणारी अनुचित घटना टाळण्यासाठी आत्ताच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनेक जिवांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत.
पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेचे तीन-तेरा; प्लॅटफॉर्मवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी#punerailwaystationpic.twitter.com/sbGVElGN9Q
— Lokmat (@lokmat) August 5, 2023