शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

दुर्देवाने दलितांना स्वामी विवेकानंद माहीत नाहीत: बी.जी.कोळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 1:00 PM

दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही.

ठळक मुद्देधार्मिक सलोखा दिन 

पुणे : स्वामी विवेकानंदांनी दलितांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही. विवेकानंद, शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, संत तुकाराम यांनी कायम बहुजनांची बाजू मांडली. ही नावे घेतली तर आंदोलन व्यापक होते, हे मी आंबेडकरवाद्यांना सांगू इच्छितो. संत हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी समाजातील समानतेसाठी लढा दिला, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. दोन टक्के कर वाढवला तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी समाजाला मोफत पुरवता येतील, याबाबत मंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांच्या ११७ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत, जनता दल सेक्युलर, अभिव्यक्ती, बहुसांस्कृतिक एकता मंच आदी संस्था-संघटनांच्या वतीने ४ जुलै हा दिवस धार्मिक सलोखा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुरुवारी गूडलक चौक येथे सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कोळसे पाटील बोलत होते. ‘ना भगव्यांचे, ना हिंदूंचे, विवेकांनंद सर्वांचे’, ‘प्यार बाटते चलो’, ‘जातीधर्माचे बंधन तोडू, माणसामाणसातील नाते जोडू’ अशा घोषणा यावेळी तरुण-तरुणींनी दिल्या. कोळसे पाटील म्हणाले, ‘आपल्या देशात खरे बोलणे हा गुन्हा ठरतो. परंतु, चुकीच्या गोष्टींविरोधात बोलले पाहिजे. धार्मिक सलोख्यासाठी अनेक संघटना रस्त्यावर येऊन काम करत आहेत,समाजात जागृती घडवत आहेत. धर्माच्या नावावर वाढणा-या बांडगुळांनी आपला मेंदू सडवला आहे. हा मेंदू जागृत केला पाहिजे.’आझम कँपसचे ऋषी आचार्य म्हणाले, ‘आज धर्माच्या नावाखाली कटुता पसरवली जात आहे. राम म्हटले नाही म्हणून हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत सांप्रदायिक सौहार्द ही भारताची ओळख कायम राहिले पाहिजे. कट्टरता सहन केली जाणार नाही, हा संदेश सर्वदूर पसरला पाहिजे.’जमात ए इस्लामचे आझीम शेख म्हणाले, ‘आपण सर्वांनी द्वेष बाजूला ठेवून माणुसकी जपु या. धर्माच्या नावाखाली षड्यंत्र रचले जात असताना धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतले पाहिजे. बंधुभावाचा संदेश पसरवला पाहिजे. भारत बलशाली बनवण्यासाठी, सोनेरी दिवस परत आणण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.’अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे म्हणाले, ‘भारत देश अखंड ठेवायचा असेल तर धार्मिक सलोखा ही काळाची गरज आहे.  विवेकांनंदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा लागेल. जगावर राज्य करायचे असेल तर धर्माधर्मातील मतभेद मिटले पाहिजेत. धर्माच्या ठेकेदारांनी सलोख्याचे विचार कैद केले आहेत. त्यातून बाहेर पडून देशाच्या विकासाला चालना देणारे विचार पुढे यावेत.’अलका जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीरज जैैन तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद