पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी बाबूराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST2021-02-27T04:12:52+5:302021-02-27T04:12:52+5:30

सासवड (ता. पुरंदर) येथील श्रीमती कमलाबाई मुथा कन्या प्रशाला येथे पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष शिक्षक नेते ...

Baburao Gaikwad as the President of Purandar Taluka Teachers Democratic Front | पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी बाबूराव गायकवाड

पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी बाबूराव गायकवाड

सासवड (ता. पुरंदर) येथील श्रीमती कमलाबाई मुथा कन्या प्रशाला येथे पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष शिक्षक नेते जी. के. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी व पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी रिक्त झालेल्या अध्यक्षपदी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल सय्यद, सचिव दिलीप पापळ, पुरंदर तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष नीलेश जगताप, उपाध्यक्ष प्रल्हाद कारकर, जिल्हाध्यक्ष रामप्रभू पेटकर, संजय भिंताडे, सचिव जालिंदर घाटे, सचिव प्रशांत बेंगळे व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

सदर निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष बाबूराव गायकवाड यांचा सत्कार कार्याध्यक्ष संजय भिंताडे यांचा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक हरुन आत्तार, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते नंदकुमार सागर, सहसचिव सुधाकर जगदाळे, आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, मुख्याध्यापक रामदास शिंदे आदींच्या हस्ते करण्यात आला.

बाबूराव गायकवाड

Web Title: Baburao Gaikwad as the President of Purandar Taluka Teachers Democratic Front