शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 17:42 IST

वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे

पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी गुरूवारी सकाळपासून आत्मक्लेष उपोषण सुरू केल आहे. आताच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले पुण्यतिथीदिनी असे आंदोलन करणार असल्याचे डॉ. आढाव यांनी संविधानदिनी जाहीर केले होते. आमदार छगन भुजबळ, रोहित पवार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी डॉ. आढाव यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत यांनी आढाव यांची भेट घेऊन आत्मक्लेश उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे. महाविकास आघाडीतील शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी बाबांना दिले. उद्धव ठाकरेंच्या विनंतीला मान देत अखेर बाबा आढावांनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतले.  ठाकरे म्हणाले, आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव हे प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांची प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय इ व्ही एम चा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे. शेवटच्या एका तासात 76 लाख मते का वाढली? असा सवाल यावेळी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एवढं राक्षसी बहुमत असुन देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजा - अर्चा करण्यासाठी का जातायत. अमावस्येला पुजा अर्चा करण्यासाठी गेलेत यावरुन यांची मानसिकता दिसुन येते‌.  महाराष्ट्र लेचा पेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. हेच जर आमच्या बाबतीत असंत तर राष्ट्रपती राजवट लागली असती. अशी टीका यावेळी त्यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBaba Adhavबाबा आढावagitationआंदोलनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटीलSanjay Rautसंजय राऊत