शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:25 IST

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला. यामध्ये आरोपी म्हणून आतापर्यंत बंडू आंदेकर यांच्यासहित १४  जणांना अटक करण्यात आली आहे. आता एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. बंडू आंदेकर यांची सून आणि वनराज आंदेकरची बायको सोनाली आंदेकर हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.      

कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा पोलिसांना शरण आला. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर मुनाफ पठाण यालाही आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १४ झाली आहे.   

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी आणखी काही पुरावे शोधण्यासाठी कुटुंबासहीत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणी गुजरात सीमेवरून शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. तर शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता मुनाफ पठाणलाही पिस्टल पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या १३ जणांना अटकही करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यूFamilyपरिवारhusband and wifeपती- जोडीदार