शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर मुनाफ पठाणला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:43 IST

आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे

पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली होती. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा अखेर पोलिसांना शरण आला. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर मुनाफ पठाण याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १४ झाली आहे.   

आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार आरोपी मुनाफ पठाण याला केली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आज पठाणला कोर्टात हजर केले जाणार आहे. कोमकर खून प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.  वनराज आंदेकर च्या खुनाचा बदला घेण्यासाठी जो कट रचला त्यामध्ये मुनाफ पठाण ही सहभागी होता. पठाण हा कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर आहे. 

या प्रकरणी गुजरात सीमेवरून शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. तर शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता मुनाफ पठाणलाही पिस्टल पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या १३ जणांना अटकही करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसPoliticsराजकारणSocialसामाजिकDeathमृत्यूCourtन्यायालयArrestअटक