शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

Gudhi Padwa: माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून साकारला रांजणगावच्या महागणपतीचा अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:19 IST

अलंकापुरीत पाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी घेतले माऊलींच्या समाधीचे दर्शन

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी माऊली... माऊली... माऊलींच्या.. नामघोषात संजीवन समाधीचे दर्शन घेतले. गुढीपाडव्या निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून रांजणगावच्या महागणपतीचा अवतार साकारण्यात आला. अभिजित धोंडफळे व देवस्थानच्या सहकार्यातून चंदन उटी साकारली. माऊलींचे श्री गणेश अवतारातील हे मनमोहक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.       तत्पूर्वी, माऊलींच्या मंदिरात पहाटे साडेतीन वाजता घंटानाद झाला. साडेपाचच्या सुमारास पवमान पूजा व दुधारती संपन्न झाली. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा घेण्यात घेऊन माऊलींना साखरगाठी अर्पण करण्यात आली. तद्नंतर ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय'' असा नामघोष करून भाविकांना 'श्रीं'च्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. दिवसभरात सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान वीस हजारांहून अधिक भाविकांनी देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरMahaganpati, Ranjangaonमहागणपती, रांजणगावgudhi padwaगुढीपाडवा