शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बारामती तालुक्यात यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता;  मागील वर्षी सुरू होते ४९ टँकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:13 IST

मागील वर्षी दुष्काळात होरपळणाऱ्या बारामती तालुक्यातील यंदाची पाणीपुरवठा स्थिती समाधानकारक

ठळक मुद्देअद्याप तरी टँकर मागणीचे प्रस्ताव आले नाहीत पंचायत समितीकडे प्रस्ताव

रविकिरण सासवडे- 

बारामती : उन्हाळा म्हटलं की बारामती तालुक्यात टँकर असं समीकरण ठरलेलं आहे. तालुक्याच्या जिरायती भागात तर उन्हाळ्याचे चार महिने पाण्याच्या शोधात महिला-पुरुषांना पायपीट करावी लागते. मात्र, यंदा पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे अद्यापतरी जिरायती भागातील जनतेला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली नाही. मागील वर्षी दुष्काळात होरपळणाऱ्या बारामती तालुक्यातील यंदाची पाणीपुरवठा स्थिती समाधानकारक आहे. मागील वर्षी मे महिन्यात तालुक्यात 33 गावे आणि 361 वाड्यावसत्या मधील 90 हजार 388 लोकसंख्येला 49 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यंदा मे महिन्यात एकही टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 424.9 मिलीमीटर एवढे आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडत विक्रमी आकडा गाठला.  606.6 मिलीमीटर पावसाची नोंद मागील वर्षी तालुक्यात झाली होती. हा पाऊस सरासरीच्या 142 टक्के एवढा झाला होता. पंचायत समितीच्या वतीने दिलेल्या माहिती नुसार 17 ते 18 वर्षात प्रथमच बारामती तालुक्यात एवढा पाऊस झाला होता. तालुक्यातील पाझर तलाव,  वळण बंधारे,  साठवन तलाव,  कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,  खोलीकरण केलेले ओढे यामध्ये एकूण 654.71 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला होता. यामुळे तालुक्यातील विहिरी,  नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत झाले. परिणामी उन्हाळ्या संपत आला तरी तालुक्यातुन अद्याप टँकरची मागणी झाली नाही. तालुक्यात सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत.त्यापैकी कारखेल योजना बंद आहे. तर भिलारवाडी,  साबळेवाडी,  पानसरेवाडी आणि देऊळगाव रसाळ याठिकाणी स्रोत उपलब्ध नसल्याने योजना नाहीत. 99 ग्रामपंचायती पैकी 63 ग्रामपंचायतीमध्ये नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. 

अद्याप तरी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले नाहीत. जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर जिरायती भागात  एखादा टँकर सुरू होईल. सध्या तरी तालुक्यात टँकर कोठेही सुरू नाही. पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने समाधानकारक स्थिती आहे.- एन. एस. ढवळे शाखा अभियंता,  ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,बारामती पंचायत समिती 

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीRainपाऊसAjit Pawarअजित पवार