शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

By admin | Updated: August 4, 2014 04:20 IST

माळीण येथील दुर्घटनेनंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे

मंचर : माळीण येथील दुर्घटनेनंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन दिले आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेने १० हजार डॉलर्सची मदत पाठविली असून पुनर्वसनासाठी ७५ हजार डॉलर्सचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.माळीण दुर्घटनेनंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील मदतकार्यावर स्वत: लक्ष ठेवून आहे. त्यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी त्यांच्या शिकागो (अमेरिका) येथील मुख्य कार्यालयाला घटनेचा अहवाल पाठविला होता. त्यानुसार लायन्स क्लबने तत्काळ दहा हजार डॉलर्सची मदत देऊ केली. या रकमेचा उपयोग दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांना पाणी, खाणे, औषधे, कपडे, भांडी या स्वरूपात पुरविले जाणार आहे.लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची आज भेट घेतली. प्रांतपाल विक्रांत यादव, शशिकांत वाजगे, डॉ.सदानंद राऊत, विवेक मुळे, दीपक वारुळे, संदीप मुथ्था, जितेंद्र गुंजाळ, अजय चोरडिया, मच्छिंद्र मुंडलीक, विकास दरेकर, अभय शास्त्री, डॉ. विलास नायकोडी आदी उपस्थित होते. लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी मदतकार्याविषयी वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली. प्रांतपाल विक्रांत यादव म्हणाले, ‘‘माळीण येथे जाऊन आम्ही भेट दिली असून, मास्क, हातमोजे, तसेच औषधे मदत दिली आहे. घरे बांधून पुनर्वसनासाठी ७५ हजार डॉलर मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठविला असून, लायन्स क्लबच्या शिकागो येथील मुख्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. देशातील लायन्सच्या इतर क्लबकडून सुमारे १० हजार डॉलर्सची मदत मिळू शकते,’’ असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.बेलसरवाडी येथील बैलगाडामालक एम. गावडे यांच्या मुलाचा साक्षीगंध अवसरी येथे आज होता. गावडे यांनी सकारात्मक फाटा देऊन ती रक्कम माळीण दुर्घटनेच्या पुनर्वसनासाठी देऊ केली. (पान ८ वर)