VIDEO : बारामतीच्या रिक्षावाल्याची 'लय भारी' अदा; लावणी डान्सवर तुम्हीही व्हाल १०० टक्के फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 20:53 IST2021-03-06T19:23:09+5:302021-03-06T20:53:11+5:30
लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड व्हायरल...

VIDEO : बारामतीच्या रिक्षावाल्याची 'लय भारी' अदा; लावणी डान्सवर तुम्हीही व्हाल १०० टक्के फिदा
बारामती: लावणी म्हटलं की दिलखेचक अदा, घायाळ करणारे सौंदर्य हे ओघाने आलेच..पण बारामती शहरातील एका अवलिया रिक्षावाल्याने ''मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा'' या गाजलेल्या लावणीवर 'लयभारी' ठुमका धरत महिला नृत्यांगणांना देखील लाजविणारे नृत्य सादर केले. आणि लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बाबजी कांबळे असे या बारामतीच्या अवलिया रिक्षाचालकाचे नाव आहे. खास मित्रांनी केलेल्या फर्माईशीतून कांबळे यांनी त्यांची कला सादर केली. नृत्य सादर करताना मित्रांनीच त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण केले. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. बाबजी कांबळे यांच्या या व्हिडिओच्या फेसबुकवरील पोस्टवर लोकप्रिय 'लयभारी' या पेजवर लाईक, कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडिओ महाराष्ट्रातील पसंतीस उतरत असून या लावणी डान्सवर 'वाहवा' कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहणाऱ्यांचा संख्या लाखात पोहचली आहे.
बारामतीच्या रिक्षावाल्याची लयभारी अदा; लावणी डान्सवर तुम्हीही व्हाल १०० टक्के फिदा #SocialViralpic.twitter.com/Hx100AXP3i
— Lokmat (@MiLOKMAT) March 6, 2021
बाबजी कांबळे हा तरुण बारामती शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या गुणवडी गावाचा तो विद्यमान सदस्य देखील आहे. हरहुन्नरी स्वभाव असलेल्या बाबाजीची कला सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्रथमच पुढे आली आहे. बारामतीच्या या कलाकाराची ही अदा महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली आहे. या रिक्षाचालकाने एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल अशी दमदार लावणी सादर केली आहे.