शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
4
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
5
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
6
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
7
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
8
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
10
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
11
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
12
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
13
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
14
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
15
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
16
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
17
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
18
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
19
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
20
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एफ़टीआयमध्ये स्थापन होणार ' लेखक अ‍ॅकॅडमी '  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:12 IST

दर्जेदार संहिता असेल तर कोणतीही कलाकृती यशस्वी होते..

ठळक मुद्दे आशयघन चित्रपट, मालिका, नाटक निर्मितीसाठी लेखन विषयाला प्राधान्य दिले जाणार

पुणे: दर्जेदार संहिता असेल तर कोणतीही कलाकृती यशस्वी होते याच जाणीवेतून एफटीआयआयने लेखक अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाने व सोसायटीने या निर्णयाला मान्यता दिली असून, आगामी काही महिन्यांत एफटीआयआयमध्ये लेखक अ‍ॅकॅडमी स्थापन केली जाणार आहे.     तब्बल 22 वर्षांनंतर झालेल्या एफटीआयआयचा पदवीप्रदान सोहळ्यानिमित्ताने एफटीआयआयचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, मनोरंजन क्षेत्राला कौशल्य विकसित असलेल्या लेखकांची गरज आहे. या क्षेत्राला लेखकांची वानवा जाणवू लागली आहे. दर्जेदार संहितेमुळेच चित्रपट यशस्वी ठरवू शकतो. लेखकाने चित्रपट माध्यमासाठी लिखाणाचे तंत्र शिकले पाहिजे. लेखकाने पटकथा लिहिली आणि तो मोकळा झाला, असे आता नाही. तर, हा आशय पडद्यावर कसा साकारतो, या प्रक्रियेतही लेखक असला पाहिजे. चित्रपट, मालिका, वेबसीरिज, जाहिराती, नाटक यासाठी कौशल्याने आणि आशयपूर्ण लेखन करतील. शक्यतो प्रादेशिक भाषेत शिकविण्याचा आमचा प्रयत्न असेल.     सध्या एफटीआयआयमध्ये पटकथा लेखन  हा विषय अभ्यासक्रमात असला तरी स्वतंत्र अ‍ॅकॅडमीमुळे लेखन विषयावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. मनोरंजन माध्यमाचे स्वरूप बदलत असून आशयघन चित्रपट, मालिका, नाटक निर्मितीसाठी लेखन विषयाला प्राधान्य दिले जाणार आहे. वेबसीरिजच्या वाढत्या रेट्यामुळे दर्जेदार आशयाची गरज भासू लागली आहे. यादृष्टीने लेखन तंत्र उमगलेले लेखक घडविले जातील, याकडे  सिंग यांनी लक्ष वेधले.   ------------कॉर्पोरेट क्षेत्राकडून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठी निधी उभारणार  एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसाठीही कॉर्पोरेट कंपन्यांनी आर्थिक गुंतवणूक करावी, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या वर्षांत कॉर्पोरेट कंपन्यांकडून किमान पाच कोटी निधी उभा करून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना तो प्रकल्पासाठी दिला जाईल. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या चांगल्या कल्पनांसाठी पन्नास लाख रुपये निधी देऊन दर्जेदार माहितीपटांची निर्मिती करता येईल. सरकारकडे पैसा नसल्यामुळे निर्मितीला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला सहभागी करून घेण्याशिवाय पर्याय नाही. या प्रकल्पातून माहितीपटांची व लघुपटांची चळवळ उभी राहू शकते, असे बी. पी. सिंग यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयcinemaसिनेमाWebseriesवेबसीरिज