शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंचधातूंनी बनवलेली शुभचिन्हे; आई तुळजाभवानीची प्रतिमा, पंतप्रधान मोदींसाठी 'दिग्विजय योद्धा पगडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:39 IST

मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष सन्मान करण्यात येणार

पुणे : महाराष्ट्रात आज सातारा, सोलापूर आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. पुण्यात रेसकोर्सच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास २ लाख नागरिक सभेला उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींचा दिग्विजय योद्धा पगडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने ही पगडी मोदींना देण्यात येणार आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून ही विशेष पगडी तयार करण्यात आली आहे. 

काय आहे दिग्विजय योद्धा पगडी? 

मुरुडकर यांच्या वतीने सुरेख अशी लाल रंगाची पारंपरिक पुरातन पद्धतीने हाताने बांधलेली पगडी तयार करण्यात आली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभ चिन्हे, आई तुळजाभवानीची प्रतिमा पगडीवर आहे. ही पगडी पूर्णपणे एअर कंडीशन आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली असल्याचे मुरुडकर यांनी सांगितले आहे. दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे. 

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. २१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत. या सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. २२ ठिकाणी एलईडी लावण्यात येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmurlidhar moholमुरलीधर मोहोळSocialसामाजिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४