ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:49 IST2017-12-25T13:45:10+5:302017-12-25T13:49:16+5:30

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Aurangabad youth Death in pune who went to Rajgad Fort for trekking, died due to heart attack | ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

ठळक मुद्देशवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला मृतदेहराजगड किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८, सध्या रा. वारजे, मूळ रा. औरंगाबाद) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला.
याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी पुण्यातून गणेश देशमुख हा मित्रांसह आला होता. रविवारी दुपारी २च्या सुमारास किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले. मित्रांनी गणेशला पायथ्याशी आणले मात्र हदयविकाराचा झटका आल्याने तो बेशुद्ध पडला. मित्रांनी १०८ क्रमांकाला फोन करुन वेल्ह्यातून रुग्णवाहिका मागवून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार यांनी युवक मृत झाल्याचे घोषित केले. वेल्हे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
 

Web Title: Aurangabad youth Death in pune who went to Rajgad Fort for trekking, died due to heart attack