शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 21:52 IST

पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात.. एकूण ९२ हजार ७४० विद्यार्थी

ठळक मुद्देलॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर ते साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार गावी गेलेली आणि लवकर परतू न शकणारी मुले किती आहेत, याची पटपडताळणी होणार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्यावरून तर्कवितर्क सुरू असतानाच आता पालिकेच्या शाळाही १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. फक्त ही शाळा भरणार आहे ऑनलाईन. एरवी शाळेच्या ज्या वेळा होत्या त्याच वेळेत शाळा भरणार असून त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. पहिली ती आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत दिली जाणारी पुस्तके महापालिकेच्या पाच केंद्रांवर पोहोचली आहेत. ही पुस्तके पुढील पाच दिवसात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यन्त पोचविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यापुढील पाच दिवसात ही पुस्तके पालकांना बोलावून त्यांच्याकडे दिली जाणार आहेत. पालकांना वेळा ठरवून दिल्या जाणार असून त्याच वेळांमध्ये येऊन त्यांना पुस्तके घ्यावी लागतील. पालकांचे मोबाईल क्रमांक घेऊन तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुप्सचा वापर यासंदर्भातील सूचना देण्याकरिता केला जाणार आहे. शिक्षण विभागाशी संबंधित सर्व विभागांनी 'एज्युमित्रा अ‍ॅप' डाऊनलोड केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी ७० हजार १३९ आयडी उघडण्यात आले असून ते पालकांपर्यंत पोचविण्यात आले आहेत. पालकांना या अँपच्या सहाय्याने पुस्तके डाऊनलोड करता येणार आहेत. पालकांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. ------------- महापालिका शाळांमध्ये असंघटित कामगार आणि आर्थिक दुर्बल घटकांतील मुले शिकतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर, कामगार वगैरे आपापल्या गावी गेले आहेत. गावी गेलेली आणि लवकर परतू न शकणारी मुले किती आहेत, याची पटपडताळणी होणार असून शाळा सुरू झाल्यावर पटसंख्या स्पष्ट होईल. --------------- १. महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण ९२ हजार ७४० विद्यार्थी आहेत. अन्य मुलांनाही समाविष्ट करून घेतले जाणार असून शिक्षक करणार पाठपुरावा२. पुस्तकांशिवाय दप्तर, शूज, मोजे, गणवेश आणि अन्य स्टेशनरी शाळेतर्फे दिली जाते. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर ते साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाStudentविद्यार्थीonlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र