डेंगीची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: June 12, 2014 05:30 IST2014-06-12T05:30:00+5:302014-06-12T05:30:00+5:30

येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.

Attempts to rectify dengue | डेंगीची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

डेंगीची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा : येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. १,४०९ घरांची आरोग्य विभागाने तपासणी करून घरांतील साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर असल्याची परिस्थिती पाहण्यास मिळाली आहे.
कोरेगाव भीमामध्ये डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळल्याने जिल्हा आरोग्य विभागाने तत्काळ फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण गाव डेंगीमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. कोरेगाव भीमातील गावठाण हद्दीत दि. १० रोजी १२ फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी सुजाता परदेशी यांनी कोरेगाव भीमामध्ये तात्पुरत्या रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर डेंगीचा ज्या क्षेत्रात जास्त प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने डेंगीच्या साथीबाबत जनजागरण करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये माहिती पत्रकही वाटण्यात आल्याचे सरपंच अशोक काशिद, उपसरपंच नीलेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी तानाजी इसवे यांनी सांगितले. नागरिकांनी साठवलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. हे पाणी ओतून देण्यास मात्र नागरिक तयार होत नसल्याने डेंगीच्या निर्मूलनात अडचणी येत असल्याची खंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Attempts to rectify dengue