पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह उद्योजक सासऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:47 PM2021-07-01T15:47:02+5:302021-07-02T00:42:56+5:30

पत्नीला मारहाण करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Attempted murder of wife by firing ; case filed hinjawadi | पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह उद्योजक सासऱ्यावर गुन्हा दाखल

पत्नीवर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह उद्योजक सासऱ्यावर गुन्हा दाखल

Next

पिंपरी : पत्नीला मारहाण करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तसेच रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिच्या पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार २३ मे २०१९ ते २४ जून २०१९ या कालावधीत घडला.

पीडित महिलेने याप्रकरणी गुरुवारी (दि. १) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर रिवॉल्वरने गोळी झाडून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अत्याचार करण्यासाठी तिच्या पतीला त्याच्या वडिलांनी अपप्रेरणा दिली. तसेच विवाहितेला काठीने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Web Title: Attempted murder of wife by firing ; case filed hinjawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app