कोंबड्या चोरल्याचे सांगितल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 19:01 IST2021-04-04T19:01:10+5:302021-04-04T19:01:49+5:30

कोयत्याने व बिअरच्या बाटलीने वार करुन जबर जखमी केल्याचा प्रकार

Attempted murder on suspicion of stealing hens | कोंबड्या चोरल्याचे सांगितल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न

कोंबड्या चोरल्याचे सांगितल्याच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न

ठळक मुद्देदत्तनगर परिसरात सांगून लोकांचा गैरसमज करून दिल्याच्या संशय

पुणे : कडकनाथ कोंबड्या चोरुन नेल्याबाबत परिसरातील लोकांना सांगितल्याचा गैरसमज करुन घेऊन तिघांनी एकावर कोयत्याने व बिअरच्या बाटलीने वार करुन जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संदिप नथुराम खैरे (वय ४०, रा. दत्तनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी सचिन खैरे, पपुल्या आणि शुभम टेम्पो अशा तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज मित्र मंडळात गणपतीची आरती करताना २ एप्रिल रोजी गणेश खैरे, सागर बराटे यांच्यामध्ये भांडणे झाली होती. यावेळी संदिप खैरे यांनी त्यांना समजावून सांगितले होते. तसेच फिर्यादींच्या कडकनाथ कोंबड्या आरोपी सचिन खैरे याने चोरून नेल्याचे दत्तनगर परिसरात सांगून लोकांचा गैरसमज करून दिल्याच्या संशयावरून तिघांनी बिअरच्या बाटलीने त्यांच्या डाव्या कानावर व लोखंडी कोयत्याने डाव्या हाताच्या पंजावर, पायाच्या नडगीवर वार करून लाथाबुक्यांनी मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची पत्नी आणि नातेवाईकांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Attempted murder on suspicion of stealing hens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.