क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:10 IST2021-05-22T21:09:58+5:302021-05-22T21:10:36+5:30
भारती विद्यापीठ पोलिसांची पिता- पुत्रांना अटक

क्षुल्लक कारणावरून महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना
पुणे : मुलाचा किरकोळ अपघाताचा राग मनात धरुन दोघांनी महिलांला मारहाण करुन ती खाली पडली असताना तिच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पितापुत्रांना अटक केली आहे.
असिफ अब्दुल रेहमान शिकीलकर (वय ५२, रा. मेमनवाडा, संतोषनगर, कात्रज) आणि अमिन असिफ शिकीलकर (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना संतोषनगर येथील दामगुडे बिल्डिंगमध्ये २० मे रोजी रात्री दहा वाजता घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकाशेजारी राहायला आहेत.
फिर्यादी व आरोपी यांचा मुलाचा किरकोळ अपघात झाला होता. त्याचा राग मनात धरुन आरोपी हे शिवीगाळ करुन बघून घेतो, अशी धमकी देत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे पती त्यांना समजाविण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या पोटावर, तसेच गुप्तांगावर लाथा मारुन त्यांचा विनयभंग केला. त्या खाली पडल्या असताना त्यांच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे अधिक तपास करीत आहेत.