पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 13:22 IST2021-08-17T13:22:18+5:302021-08-17T13:22:27+5:30
हडपसरमधील काळेपडळमधील घटना : तिघांना अटक

पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसरपोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश रवी सरोदे (वय २२) सुदर्शन रामु जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा़ फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समीर भिमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरळे व त्यांच्या मित्रांची आरोपींबरोबर दुपारी भांडणं झाली होती. त्यानंतर नरळे त्यांचे मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉलचे रोडवरुन जात होते. यावेळी टोळक्याने त्यांना अडविले. विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.