शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

पुन्हा पोटगी मिळविण्याचा प्रयत्न; पत्नीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: May 9, 2025 19:30 IST

पुणे : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार सेलू येथील न्यायालयाने पूर्वी अंतरिम पोटगी मंजूर केली असतानाही तिने ही ...

पुणे : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार सेलू येथील न्यायालयाने पूर्वी अंतरिम पोटगी मंजूर केली असतानाही तिने ही बाब लपवून ठेवली आणि पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात पंचवीस हजार रुपयांच्या अंतरिम पोटगीसाठी अर्ज केला. मात्र, तथ्य दडवून ठेवणाऱ्या पत्नीचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. यादव यांनी फेटाळला.

या प्रकरणात पतीने पत्नीपासून घटस्फोट देण्याच्या मागणीसाठी हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ नुसार पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर पत्नीने कौटुंबिक हिंसाराचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सेलू येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात पतीविरोधात दावा दाखल केला. सीआरपीसी कलम १२५ (३) तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर दोन्ही प्रकरणांत तिला पोटगी मंजूर झाली. त्यानंतर पत्नीने पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी मिळण्यासाठी दावा दाखल केला. पत्नीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. पती दैनंदिन खर्च व जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी पैसे देत नाही, असे पत्नीने अर्जात म्हटले होते.या प्रकरणात पतीच्या वतीने ॲॅड. दीपा सातव आणि ॲड. अनंत कच्छवे यांनी बाजू मांडली. पत्नीला यापूर्वीच अंतरिम पोटगी मंजूर आहे. पत्नी उच्चशिक्षित असून नोकरी करते. एका खासगी संकेतस्थळावरील प्रोफाइलमध्ये तिने आपण एका नामांकित फायनान्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे नमूद केले. तसेच ती शहरातही जॉब करत होती. तिने केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले बँक खाते नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्याशिवाय एखादी कंपनी पगार कशी करू शकते याकडे ॲॅड. कच्छवे व ॲॅड. सातव यांनी लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळून लावला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस