शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

रेल्वे सिग्नलची वायर कापून लुटणारी टोळी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 1:54 AM

चोरीसाठी वापरायचे रेल्वे अ‍ॅप

पुणे : राज्यात विविध ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यानंतर प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळीपैकी तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली आहे. रोहित गणेश रारेभात, बाबू मोहन कसबे, विनोद सखाराम जाधव (तिघेही रा. जामखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीमध्ये १० ते १२ जणांचा समावेश असून त्यांनी मागील तीन ते चार महिन्यांत राज्यभरात ३६ ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यावर प्रवाशांना लुटल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून एक कार व दुचाकी, वायर कापण्यासाठी लागणारे कटर जप्त करण्यात आले आहे.

याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त डी़ विकास, सहायक सुरक्षा आयुक्त बी़ के . मकरारिया यांनी माहिती दिली़ मागील काही दिवसांपासून सातारा पुणे विभागात कटरच्या साह्याने सिग्नल वायर कापून रेल्वेची सिग्नल यंत्रणा प्रभावित करीत चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करूनही या घटनांमध्ये वाढ झाली होती. १३ सप्टेंबर रोजी पुणे सातारा विभागातील पळशी स्टेशनवर पुन्हा अशी घटना घडली होती. त्याअनुषंगाने सातारा येथील आरपीएफ निरीक्षक यांनी या घटनांचा बारकाईने अभ्यास केला. तीन ते चार महिन्यांच्या काळात कुर्डुवाडी ७, सातारा ४, गुंटकल ७, नांदेड, परभणी, लातूर ७, कोकण रेल्वे ६, भुसावळ ४ अशा एकूण ३६ घटना घडल्या असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळांवरील मोबाईल क्रमांकांचा डम्प डाटा काढून माहिती काढली. त्यात हे गुन्हे घडले त्यावेळी प्रत्येक ठिकाणी काही मोबाईल सक्रिय असल्याचे आढळून आले़ तेव्हा चोरी करणारे १० ते १२ जण असून गुन्हा केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जात असल्याचे समोर आले. त्यानंतर आरपीएफचे निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील जीआरपी व सातारा येथील आरपीएफच्या संयुक्त पथकाने नाशिक परिसरात त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली. तिघांनीही या घटनांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे़या ३६ गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली असून त्यात किती माल चोरीला गेला होता, याचा शोध घेतला जात आहे़चोरीसाठी वापरायचे रेल्वे अ‍ॅपचोरी करावयाच्या ट्रॅकवर कोणती रेल्वे येणार आहे, हे पाहण्यासाठी तिघेही मोबाईल अ‍ॅपवरून त्या ट्रॅकवरील रेल्वेचे लोकेशन पाहत असत. त्यानंतर ती जवळ आली, की रेल्वेची सिग्नल वायर कापत. वायर कापल्यावर रेल्वेला लाल सिग्नल दिसला, की रेल्वे थांबल्यावर आतील प्रवाशांच्या मोबाईल, सोने यावर डल्ला मारत असत. आपली ओळख पटू नये, म्हणून ते गुन्हा करावयाच्या जागेपासून २ ते ३ किमी अगोदर मोटार, दुचाकी पार्क करीत व तेथून चालत जाऊन गुन्हा करीत असत़

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोरPuneपुणे