शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

एक रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल ३७ हजारांना विकण्याचा प्रयत्न; पुणे गुन्हे शाखेने केली चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:39 IST

खडकी बसस्टॉपकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण रेमडेसिविर इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात तब्बल ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली. 

निकीता गोपाळ ताले (वय २५, रा. एमआयडीसी, भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय २७), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २०, दोघे रा. अमित अपार्टमेंट, चाफेकर चौक, चिंचवड), प्रतीक गजानन भोर (वय 26, अनुसूया पार्क,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना खडकी बसस्टॉपकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण रेमडेसिविर इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, यांनी सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. बनावट ग्राहक तयार करुन गुरुद्वारा परिसरात निकीता ताले हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून १ इंजेक्शन जप्त केले. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांच्या मदत घेण्यात आली. तिच्याकडे केलेल्या चौकशी या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. वाळुंज हे दोघे भाऊ असून रोहन हा शिक्षण घेत आहे. 

निकीता ताले व प्रतिक भोर यांचा कार्ड प्रिटींगचा व्यवसाय आहे. निकीताला राहुल याने हे इंजेक्शन आणून दिले होते. 

शहर पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारात विकण्याचा प्रयत्न करणार्‍या ११ जणांना अटक केली आहे.रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची माहिती कळवारेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणार्‍या विरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथके कार्यान्वित केलेली आहेत. रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी त्वरीत शहर पोलिसांशी संपर्क साधावा.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं