शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पुण्यात भररस्त्यावर व्यावसायिकावर वार करुन लुबाडले; लोक मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:05 IST

कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली

पुणे : रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर सरबत पित असलेल्या तरुणाच्या मोटारसायकलला अडकविलेली लॅपटॉप असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. त्यानंतर त्याला बॅग परत देण्याचा बहाण्याने खंडणी मागितली. तेव्हा या तरुणाने बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला कोयत्याने मारहाण करुन लॅपटॉप, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. हा सर्व प्रकार विमाननगरमधील मंत्री आय टी पार्कच्या गेट शेजारील दुकानासमोर गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला. महादेव सुभाष साठे (वय २१), सोमनाथ संजय कांबळे (वय १९), अनुराग भुजंग ससाणे (वय १९, तिघे रा. यमुनानगर, विमानतळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडिया (वय ३०, कळसगाव ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरडिया हे गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता एका गाडीवर सरबत पिण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी मोटारसायकलला लॅपटॉपची बॅग अडकवली होती. तिघे जण मोटारसायकलवरुन आले व त्यांनी मोटारसायकलला अडकवलेली बॅग चोरुन नेली. त्यानंतर एक जण त्यांच्या जवळ आला. लॅपटॉपची बॅग हवी असेल तर अडीच हजार रुपये द्यावे लागतील, असे बोलला. त्याला चोरडिया तयार झाले. ते मंत्री आय टी पार्क चे गेटजवळ आले. तेथे चौघांनी लोखंडी कोयता, रॉड, वायर व पाण्याचा कॅन याने फिर्यादी यांना मारहाण करुन जखमी केले. त्याच्याकडून लॅपटॉप व रोकड जबरदस्तीने चोरुन नेला.

शेकडो लोक बनले बघे

सिद्धांत चोरडिया यांनी सांगितले की, म बॅग चोरुन नेल्यानंतर एक जण आला व त्याने बॅग मिळवून देतो, अडीच हजार द्यावे लागतील. तेव्हा मी त्याच्याबरोबर जाऊन अडीच हजार रुपये एटीएममधून काढून आणले. तेथून परत येत असताना एक जण बॅग घेऊन येताना दिसला. त्याला मी बॅग का चोरली. तेव्हा त्याने पैसे मागणार्यानेच बॅग चोरायला सांगितली. त्यानंतर त्यांनी १० हजार रुपयांची मागणी करुन मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे आजू बाजूला शेकडो लोक होते. पण कोणीही पुढे झाले नाही की पोलिसांना फोन केला नाही. तेव्हा ते तेथून पळून गेले.त्यांनी नातेवाईकांना बोलावून ते पोलिसांकडे गेले. 

याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, मंत्री आय टी पार्कजवळ दुपारच्या वेळी शेकडो जण असतात. पण कोणी पुढे येत नाही. तेथील व्यावसायिकाकडे चौकशी केल्यावर हे गर्ददुले एटीएममधून बाहेर पडणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून २०० - ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पण, कोणीही तक्रार देत नव्हते. काल तक्रार आल्यावर तातडीने शोध घेऊन चौघांपैकी तिघांना अटक केली आहे.

मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात मग्नसिद्धांत चोरडिया यांना चौघे जण मारहाण करत होते. त्यावेळी तेथे असलेल्या एक दोघांनी त्या मारहाणीचा व्हिडिओही काढला असल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड