विकृती... शरीरसंबंधास नकार दिल्यानं तरुणाचा तरुणावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:45 IST2018-05-09T13:03:08+5:302018-05-09T14:45:21+5:30

विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने तरुणाकडे शरीर संबंधांची मागणी केली. तरुणाने नकार देल्याने त्या व्यक्तीने तरुणावर चाकू हल्ला केला.

attack on youth who refuses to have sex | विकृती... शरीरसंबंधास नकार दिल्यानं तरुणाचा तरुणावर चाकूहल्ला

विकृती... शरीरसंबंधास नकार दिल्यानं तरुणाचा तरुणावर चाकूहल्ला

पिंपरी : शरीर संबंधास नकार देणाऱ्या तरुणावर विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने चाकू हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री हिंजवडी येथे घडली.

हरिश रमेश कुकरेजा (रा. लकी बेकरीसमोर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दत्तनगर चिंचवड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरूणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी तरुण व आरोपी कुकरेजा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कुकरेजा व फिर्यादी सोमवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास मुंबई बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून जात होते. काही अंतर पुढे आले असता त्यावेळी आरोपी कुकरेजा याने फिर्यादी तरूणाकडे शरीर संबंधांची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या कुकरेजा याने धारदार चाकूने फिर्यादी तरुणाचा डाव्या हातावर वार करून जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: attack on youth who refuses to have sex