जुन्या भांडणाच्या रागावरुन एकाला तलवारीने भोकसले, जखमीची प्रकृती चिंताजनक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:08 IST2020-05-13T16:07:48+5:302020-05-13T16:08:35+5:30
जुन्या वादातून घडली घटना.

जुन्या भांडणाच्या रागावरुन एकाला तलवारीने भोकसले, जखमीची प्रकृती चिंताजनक...
राजगुरूनगर : राक्षेवाडी (ता. खेड) येथे अज्ञात कारणावरून एकाला तलवारीने भोकसण्यात आल्याची घटना मंगळवारी(दि१२) रात्री घडली. यामध्ये दत्तात्रय विठ्ठल राक्षे (वय ४५ ) हा गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी दत्तात्रय यांचा भाऊ राजेंद्र विठ्ठल राक्षे (वय ४२ रा. राक्षेवाडी) यांनी खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी संजय तबाजी राक्षे याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तलवार देखील हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जुन्या वादातून रागाच्या भरात आरोपी संजय याने राक्षेवाडी येथील पाचारणे आळीच्या शेतात दत्तात्रय याच्यावर घरातील तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय गंभीर जखमी झाला. दरम्यान,कुटुंबातील लोकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करित आहे.