शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘सैफ’वर हल्ला, मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळली? उपमुख्यमंत्री म्हणतात, ‘माध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवल्या…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:25 IST

या हल्ल्यानंतर  मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच विरोधकांकडून सुद्धा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली. 

पिंपरी -  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्लेखोराने सैफवर सहा वेळा वार केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर दोन सर्जरी करण्यात आल्या. या सर्जरीसाठी जवळपास सहा तास लागले. यानंतर आता सैफला आयसीमधून एका स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर  मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच विरोधकांकडून सुद्धा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला ते म्हणाले,'अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या चालवल्या, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,'अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. त्यानंतर मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी माहिती न घेता चालवल्या. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर घरात कसा गेला, नेमका चोरीच्या उद्देशाने गेला की त्यांच्यातीलच कोणी यात सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.' उपमुख्यमंत्री पवार  पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSaif Ali Khanसैफ अली खान pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस