शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

IT कंपनीच्या पार्किंगमध्येच कोयता हल्ला! 'कलीग'नेच घेतला जीव… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:42 IST

आरोपीना 5 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे - शहरातील येरवडा परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. अति रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने पुणे शहर हादरले आहे.नेमकं काय घडलं?दैनिक कामकाज संपवून ही २८ वर्षीय महिला संध्याकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या वाहनतळावर आली. तिथेच महिला व तिचा सहकारी असलेला कृष्णा कनोजा (२८) यांच्यात वाद झाले. महिलेसोबत वाद झाल्यावर कृष्णा इतका संतापला की त्याने कोयत्याने सपासप वार करत तिला जखमी केलं. महिलेनं आरडाओरडा केला, ज्यामुळे तिथले सुरक्षारक्षक त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कृष्णाला अटक करण्यात आली.

'कलीग'नेच घेतला जीव या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी उघडकीस आणले की आरोपी आणि पीडितेचे दोघेही 'WNS' कॉल सेंटरमध्ये काम करत होते. कृष्णा आणि शुभदा यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला होता. वाद इतका वाढला की कृष्णाने त्या महिलेवर हल्ला केला.पोलिसांनी आरोपी कृष्णाला रात्री उशिरा अटक केली. त्याने कोयता लपवून आणला होता, त्याला कोयता नेमका कुठून मिळाला याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जात आहे. २८ वर्षीय मयत महिला, पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या बालाजी नगर भागात राहत होती. ती येरवड्यातील 'WNS' कॉल  सेंटरमध्ये काम करत होती. उपचारादरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास

येरवडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपी कृष्णा कनोजा, याची न्यायालयाने दि. 13/01/2025 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

दरम्यान, आरोपीच्या आणखी काही संदिग्ध कृत्यांबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या नेतृत्वात तपास चालू आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYerwadaयेरवडाyerwada policeयेरवडा पोलीस