शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंच्या रॅलीत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रॅली रविवारी दुपारी ४ वाजता चिंतामणीनगर, सय्यदनगर येथे चालू होती़.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वानवडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या वादातून एकाला कोयत्याने व हॉकी स्टीकने मारहाण करण्याची घटना हडपसरमधील ससाणे लॉन्ससमोर रविवारी घडली़. याप्रकरणी वानवडीपोलिसांनी अफान फारुख इनामदार, सुफियान फारुख इनामदार, अलताज ऊर्फ गजक्या व इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़चौघांना अटक केली आहे़. याप्रकरणी अन्वर शमशुद्धीन इनामदार  (वय ३०, रा़ सय्यदनगर, मंहमदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अन्वर इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची रॅली रविवारी दुपारी ४ वाजता चिंतामणीनगर, सय्यदनगर येथे चालू होती़. यावेळी अन्वर इनामदार आणि अफान इनामदार, सुफियान इनामदार यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन किरकोळ वाद झाला होता़. तो त्यांनी आपआपसात मिटविला़ रॅली संपल्यानंतर अन्वर इनामदार व त्याचे मित्र ताजुउद्दीन पठाण, निझाम शेख व अमनअल्ला सय्यद असे सायंकाळी ७ वाजता ससाणे लॉन्स समोर चहा पित बसले होते़. त्यावेळी सुफियान इनामदार, अफान इनामदार हे हातात कोयत्यासारखे हत्यार व हॉकी स्टीक घेऊन आले़. सुफियान इनामदार याने कोणीही मध्ये यायचे नाही़, कोणाच्या नादी लागला आहे तुम्हाला दाखवितो, असे म्हणून ते सर्व जण अन्वरच्या अंगावर धावून गेले़. सुफियान याने अन्वरवर कोयत्याने वार केला़ तो अन्वर याने हुकविला़ त्यानंतर अलताज याने हॉकी स्टीकने त्यांना मारहाण केली़, ही मारामारी पाहून हॉटेलमधील लोक बाहेर गेल्यावर तेथील लोकांनी हॉटेलचे शटर बंद करुन अन्वरला त्यांच्यापासून वाचविले़. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. वरपडे करत आहेत.

टॅग्स :WanvadiवानवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक