अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:40 PM2018-08-22T16:40:27+5:302018-08-22T16:40:36+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (दि. २३ ऑगस्ट) रोजी सकाळी पुण्यात येणार आहे.

Atal Bihari Vajpayee's Asthi Kalash will tomorrow in Pune | अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

Next

पुणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (दि. २३ ऑगस्ट) रोजी सकाळी पुण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथे सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकाद्वारे दिले. 

          १६ ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या अस्थी महाराष्ट्रातील काही नद्यांमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यात मुंबई, पुणे, पंढरपूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कर्जत, कराड, महाड व सांगली येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.उद्या सकाळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट मुंबई येथून पुण्यात अस्थीकलश घेऊन येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.अस्थी कलशाच्या पूजनानंतर तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.  

Web Title: Atal Bihari Vajpayee's Asthi Kalash will tomorrow in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.