अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
By नम्रता फडणीस | Updated: November 30, 2023 19:25 IST2023-11-30T19:25:08+5:302023-11-30T19:25:49+5:30
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
पुणे : महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. आशिष बानगिरवार यांना वैद्यकीय प्रवेश देताना दहा लाखाची लाच घेताना पकडल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांनी तोडफोड करून आंदोलन केले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजार करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी सी. एस. पाटील यांनी 15 रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला.
आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय दळवी, अशोक पवार, प्रवीण कदम, रुपेश घोलप आणि सचिन पवार अशी जामीन मंजूर केलेल्यांची नावे आहेत. आरोपीच्या वतीने ऍड .अमेय बलकवडे, ऍड. सचिन ननावरे, ऍड. मयूर मराठे, ऍड. ऋषिकेश कडू, ऍड. ऋषिकेश गुंजाळ, ऍड. सूरज शिंदे यांनी कामकाज पाहिले.