शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांकडून ज्योतिषाचे ‘स्टिंग’

By admin | Updated: June 12, 2015 06:11 IST

मुलगाच व्हावा, याकरिता सहकारनगर येथील एक ज्योतिषी विशिष्ट मंत्र देऊन लोकांची दिशाभूल करीत असल्याची तक्रार महापालिका आयुक्त

पुणे : मुलगाच व्हावा, याकरिता सहकारनगर येथील एक ज्योतिषी विशिष्ट मंत्र देऊन लोकांची दिशाभूल करीत असल्याची तक्रार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन कुमार यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने स्टिंग आॅपरेशन करून ज्योतिषाचा पर्दाफाश केला आहे. महापालिकेच्या विधी अधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते, सहायक आरोग्यप्रमुख, इंजिनिअर यांच्या एकत्रित टीमने ही कामगिरी यशस्वी केली.विठ्ठल तुकाराम गंजेवार ऊर्फ अण्णा गायत्री उपासक (रा. प्रगती ज्योतिष, फ्लॅट नं. १०, पियुष हाऊस, हिंगणे खुर्द) असे कारवाई करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट १९९४ व सुधारित २००३ कलम ३(ए), ६(एसी) व २२ या कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, जन्मकुंडली, पुस्तके व देणगी म्हणून देण्यात आलेले ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.देशात मुलींची गर्भातच हत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याने याविरूद्ध कठोर कारवाईचे धोरण शासनाकडून घेण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईवर केंद्र शासनाच्या एका समितीकडून देखरेख ठेवली जाते. यापार्श्वभूमीवर गंजेवार हा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पुत्रप्राप्तीसाठी मंत्र देत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेत कुमार यांनी स्टिंग आॅपरेशन करून ज्योतिषावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता विधी सहायक अ‍ॅड. निशा चव्हाण व गणेश बोऱ्हाडे यांना बहीण-भाऊ बनवून गंजेवार यांच्याकडे पाठविण्यात आले. त्याच्या आॅफिसमध्ये पहिल्यांदा जन्मकुंडल्या घेण्यात आल्या. त्यानंतर गंजेवार याची भेट दोघांना देण्यात आली. गणेश यांना मुलगा हवा त्यासाठी काय करावे लागेल, अशी त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्या वेळी गणेश यांच्या जन्मकुंडलीतील १७ क्रमांकावर वर्तुळ करून पुत्रकामेष्ठी यज्ञ व श्री गोपाल संतान यज्ञ हे मंत्र त्यांना सांगण्यात आले. त्याचबरोबर मुलगाच कसा व्हावा, याबाबतचे लेख असलेले सत्यकथा व कल्याण नमस्तु ही दोन पुस्तके गंजेवार याने गणेश यांना दिली. त्यानंतर बाहेर मोटारीमध्ये थांबलेल्या सहायक आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांना याची माहिती देण्यात आली. जाधव यांनी रेकॉर्डिंग तपासून लगेच पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट अन्वये घटनास्थळाचा पंचनामा केला.(प्रतिनिधी)