दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 08:51 PM2023-11-26T20:51:46+5:302023-11-26T20:52:08+5:30

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते.

Assistance proposal to center for drought-affected 40 talukas - Deputy Chief Minister Ajit Pawar's information | दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बारामतीराज्यात  ४० तालुक्यांमध्ये  दुष्काळ जाहीर कऱण्यात आला आहे. यासाठी केंद्राकडे पाठवलेला  निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत होईल. याशिवाय  दुष्काळसद्रुश्य स्थीती  असणाऱ्याइतर  तालुक्यात राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते. यावेळी  पत्रकारांशी बोलताना  पवार म्हणाले, बारामती तालुक्यातही यंदा पाऊस झालेला नाही. परिणामी तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गेला. तो घातला गेलेला नाही. या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त जे तालुके यादीत दुष्काळी गावांच्या यादीत आले नाहीत, तेथेही परिस्थिती भिषण रुप घेते आहे.  महसूलमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री यांची त्यासाठी समिती आहे. त्यांनी बैठक घेवून  हजारो मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. तेथेही सवलती दिल्या जातील ,असे पवार म्हणाले.

राज्यात दूधाचे दर कोसळले आहेत. बारामती दौऱयावर येथील दूध संघाचे पदाधिकारी मला भेटून गेले. यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली असताना अनुदान दिले गेले होते. आता दुष्काळी स्थितीत हिरवा चारा, खुराक, पशुखाद्य हा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत मदत करावी अशी शेतकऱयांची मागणी आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांची यासाठी बैठक घेतली होती. परंतु त्यातून मार्ग निघालेला नाही. आता मंगळवारी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू,असे उपमुख्यमंत्री   पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याचे सांगितले आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार यांनी , मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नसल्याचे  सांगितले. राज्यात मराठा, अोबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत.  रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत.  समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असे वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल,असे पवार म्हणाले. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात ऊस दर आंदोलन ऊभे केले होते. परंतु तेथील निर्णय झालेला आहे. काही अंशी तोडगा निघाला आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह साखर आयुक्तांशी चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले . 

Web Title: Assistance proposal to center for drought-affected 40 talukas - Deputy Chief Minister Ajit Pawar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.